Posts

Showing posts from May, 2020

किसान क्रेडिट कार्ड : शेतकऱ्यांना ४ टक्के दराने ३ लाखांपर्यंत कर्ज

Image
किसान क्रेडिट कार्ड : शेतकऱ्यांना ४ टक्के दराने ३ लाखांपर्यंत कर्ज By ऑनलाइन लोकमत on Sun, March 01, 2020 6:06am किसान क्रेडिट कार्डअंतर्गत शेतक-यांना ३ लाख रुपयांचे कर्ज ४ टक्के दराने देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केली. चित्रकूट : शेतकऱ्यांना सावकारांच्या कचाट्यातून सोडविण्यासाठी  केंद्र सरकारने  पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून किसान क्रेडिट कार्डअंतर्गत शेतक-यांना ३ लाख रुपयांचे कर्ज ४ टक्के दराने देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केली. यासाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूदही करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशच्या चित्रकूटमध्ये पंतप्रधान मोदी यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड वितरित करण्याची मोहीमही सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत २५ लाख लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड प्रदान करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील २,००० पेक्षा अधिक बँक शाखांना शेतक-यांना किसान क्रेडिट कार्ड देण्याचे काम सोपविण्यात आले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान म...

धक्कादायक! महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांना कोरोनाची लागण

Image
धक्कादायक! महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांना कोरोनाची लागण कोरोनाशी लढत असलेल्या महाराष्ट्रासाठी एक वाईट बातमी आहे. उद्धव ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं बोललं जातंय. त्यांना उपचारासाठी नांदेडहून मुंबईत आणण्यात आलं आहे. अद्याप त्यांच्या नावाची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. सुत्रांच्या माहितीनुसार, चव्हाण यांना कोरोनाव्हायरस त्यांच्या ड्रायव्हरपासून झाल्याचं समोर येतंय. उद्धव ठाकरे सरकारमधील हे दुसरे मंत्री आहेत जे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय कॉग्रेसमधील ते ज्येष्ठ नेते आहेत. एप्रिलच्या सुरुवातीस महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. न्यूमोनियाच्या तक्रारीमुळे ते ठाणे रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या संपर्कात सुरक्षा कर्मचार्‍यांसह १८ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं होतं. सुरुवातीला ते होम क्वारंटाईन होते त्यावेळी त्यांचा अहवाल नेगेटिव्ह आला होता. नंतर त्या...

सर्वांनाच मिळणार आरोग्य योजनेचा लाभ

Image
Solapur सर्वांनाच मिळणार आरोग्य योजनेचा लाभ Last Updated: May 24 2020 9:52PM  : महेश पांढरे  कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांनाच आरोग्य सेवा तत्काळ उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाने महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी या योजनेत लाभार्थी नसलेल्या कुटुंबांनाही समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील कमी उत्पन्न गटातील सर्वच कुटुंबांना आता महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येणार असून या योजनेत अंगीकृत करण्यात आलेल्या खासगी रुग्णालयातही लाभार्थ्यांना लाभ घेता येणार आहे. यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीने कार्यपद्धती विहित केली आहे. यामध्ये लाभार्थ्याला रहिवासी पुरावा म्हणून वैध पिवळी, केशरी, अथवा शुभ्र शिधापत्रिका ग्राह्य धरली जाणार आहे. तसेच तहसीलदार यांचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र यापैकी एक पुरावा अथवा शासनमान्य संस्थेचा सही शिक्का असलेले ओळखपत्र आवश्यक असणार आहे. कोरोनाच्या साथीचे गांभीर्य, उपचाराची तातडीची गरज पाहून या कागदपत्रांमध्ये शिथिलता करण्यात आली आहे.  सध्य...

महत्वाची बातमी : त्या शेतकऱ्यांनाही मिळणार खरीप कर्ज !

Image
महत्वाची बातमी : त्या शेतकऱ्यांनाही मिळणार खरीप कर्ज !   महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या मात्र कोरोनाच्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना खरीप कर्ज मिळणार आहे. याबाबत बँकांना सूचना देण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. यासंदर्भात राज्य शासनाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे. बाबतधिक माहिती देतांना सहकार मंत्री श्री. पाटील म्हणाले, दिनांक 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यतच्या कालावधीसाठी अल्प मुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत घेतलेल्या अल्प मुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन/फेर पुनर्गठन केलेल्या कर्जामधील दिनांक 30 सप्टेंबर 2019 रोजी रुपये 2 लाखापर्यंत थकीत व परतफेड न झालेली रक्कम असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेची कार्यवाही सुरू झाली. मात्र त्याच दरम्यान देशासह राज्यात कोरोनाचे महासंकट आले. त्यामुळे राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाले. प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ...

मुंबई: भाजपा आमदार नितेश राणे यांनी सायन हॉस्पिटल पाठोपाठ आता राजावाडी हॉस्पिटलमध्ये मृतदेहा शेजारी रूग्णावर उपचार होत असलेल्या प्रकाराचा व्हिडिओ केला ट्वीट

Image
मुंबई: भाजपा आमदार नितेश राणे यांनी सायन हॉस्पिटल पाठोपाठ आता राजावाडी हॉस्पिटलमध्ये मृतदेहा शेजारी रूग्णावर उपचार होत असलेल्या प्रकाराचा व्हिडिओ केला ट्वीट महाराष्ट्र टीम  May 24, 2020 03:36 PM        Nitesh Rane tweets video of body bag placed next to patient | (Photo Credits: Twitter) भाजप पक्षाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्वीटरवर आणखी एक खळबळजनक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत मृतदेहाच्या शेजारी रुग्णांवर उपाचार होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यापूर्वी सुद्धा नितेश राणे यांनी अशाच प्रकारचे व्हिडिओ केईएम आणि सायन रुग्णालयातील पोस्ट केले असून दोन्ही रुग्णालये शासनाकडून चालवली जातात. या धक्कादायक व्हिडिओमुळे मुंबईतील आरोग्य अधिकाऱ्यांवर जोरदार टीका करण्यात आली होती.(मुंबई: केईएम रुग्णालयातील कोरोना बाधित मृतदेहांच्या शेजारी अन्य रुग्णांवर उपचार होत असलेल्या व्हिडिओवर शिवसेना खासदार अनिल देसाई यांचे स्पष्टीकरण)  ट्वीटरवर शेअर करण्यात आलेल्या 140 सेंकदांची क्लिप नितेश राणे यांनी रविवारी ट्वीट करत पोस्ट केली आहे. त्यामध्ये एक मृतदेह प्लास्टि...

कोरोना लॉकडाऊन: विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही

Image
कोरोना लॉकडाऊन: विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही 6 तासांपूर्वी हे यासह सामायिक करा Facebook   हे यासह सामायिक करा WhatsApp   हे यासह सामायिक करा Messenger   हे यासह सामायिक करा Twitter   शेअर करा Image copyright ANI ऐन कोरोनाच्या संकटकाळात पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार आणि राज्यपाल आमने-सामने आलेत. यावेळी कारण ठरलंय ते विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा. कोरोनाचं संकट पाहता परीक्षा न घेता आधीच्या वर्षाच्या गुणांवर आता निकाल लावता येईल का, असं पत्र महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला (UGC) लिहिलं. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली. आता या प्रकरणात विविध पक्षांशी संलग्न विद्यार्थी संघटनांनीही उडी घेतल्यामुळे हे संपूर्ण प्रकरण आता विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडून राजकीय वळणावर लागलं आहे. हा सर्व वाद नेमका सुरू कुठून झाला आणि आता कुठवर आलाय, हे सर्वप्रथम आपण पाहू. त्यानंतर शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ आणि विद्यार्थी संघटनांचं म्हणणं ...

धक्कादायक..! 'एनटीपीसी'चे 17 वीज वाहक टॉवर कापले

Image
धक्कादायक..! 'एनटीपीसी'चे 17 वीज वाहक टॉवर कापले  12.19 PM पंढरपूर (जि. सोलापूर)  : पंढरपूर तालुक्‍यातील देगाव, गुरसाळे, आढीव, चिलाईवाडी, नेमतवाडी हद्दीतील एनटीपीसी प्रकल्पाचे सुमारे 17 वीज वाहक टॉवर अज्ञांनी कापल्याची धक्कादायक बाब आज सकाळी समोर आली आहे. या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना मध्यरात्री घडली असावी असा अंदाज आहे.  टॉवर उभारणीसाठी अधिग्रहण केलेल्या जमिनीला बाजार भावाच्या चारपट मोबदला मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करून ही दखल घेतली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांनी उद्विग्न होऊन हे कृत्य केले असण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील एनटीपीसी वीज प्रकल्पातून उजनी धरणाच्या पॉवर हाउससाठी वीज पुरवठा करण्याचे काम सुरू आहे. यासाठी दक्षिण सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर आणि माढा या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात सुमारे 100 फूट उंचीचे टॉवर उभे केले आहेत. संबंधित शेतकऱ्यांना 1 लाख रूपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. परंतु, ही नुकसान भरपाई अपुरी असून बाजार भावाच्या चौपट रक्कम मिळावी, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणी...

सोलापुरात रविवारी पाच नवे कोरोनाबाधित, एकुण पॅाझिटीव्ह 570

Image
सोलापुरात रविवारी पाच नवे कोरोनाबाधित, एकुण पॅाझिटीव्ह 570 सोलापूर : जिल्हा प्रशासनाने आज रविवारी सकाळी प्रसिद्ध केल्यानुसार गेल्या बारा तासांत सोलापुरात पाच कोरोनाबाधित रुग्ण वाढले. बाधित रुग्णांमध्ये चार पुरुष आणि एक स्त्रीचा समावेश आहे.  गेल्या बारा तासात एकूण.77 अहवालांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी पाच अहवाल पॅाझिटीव्ह, तर 72 निगेटीव्ह आले. त्यामध्ये पुरुष आणि स्त्रियांचा समावेश आहे. आतापर्यंत 5500 अहवालांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 570 इतके पाॅझिटीव्ह तर 4930 इतके निगेटीव्ह अहवाल आले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 46 रुग्ण मरण पावले आहेत, तर 249 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन परत घरी गेले आहेत. सोलापुरात पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे, त्याप्रमाणे बरे होऊन परतणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. संबंधित बातम्या धक्कादायक..! 'एनटीपीसी'चे 17 वीज वाहक टॉवर कापले

सोलापूरच्या ग्रामीण भागातील सलून, खासगी व सार्वजनिक वाहतूक आजपासून सुरु

Image
सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या आदेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय ठप्प झाले होते. बंद असलेल्या अनेक उद्योग व व्यवसायांना उद्यापासून (शुक्रवार) सवलत देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी 20 मे रोजी घेतला असून 22 मे ते पुढील आदेश होईपर्यंत हा सुधारित आदेश लागू असणार आहे. या आदेशामुळे ग्रामीण भागातील व बिगर प्रतिबंधीत क्षेत्रातील क्रीडा,  संकुल, स्टेडियम तसेच इतर सार्वजनिक मोकळ्या जागा या वैयक्तिक, सर्वासाठी खुल्या  असणार आहेत.  प्रेक्षक, सांघिक क्रीडा प्रकार करण्यास मनाई असणार आहे. सर्व शारीरिक व्यायाम इतर उपक्रम सोशल डिस्टन्स पाळून करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व प्रकारची सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली असून तीन चाकी वाहन एक अधिक दोन व्यक्तींसाठी आणि चार चाकी वाहन एक अधिक दोन व्यक्ती या अटीवर परवानगी देण्यात आली आहे. जिल्हा अंतर्गत बस सेवा जास्तीत जास्त 50 टक्के इतक्या मर्यादेपर्यंत आणि सुरक्षित शारीरिक आंतर व स्वच्छतेचे नियम पाळून सुरू ठेवली  जाणार आहेत. सर...

मंगळवेढा तहसीलदारांच्या सतर्कतेमुळे ‘त्यांना’ मिळाला आधार

Image
मंगळवेढा (सोलापूर) : उपजीविका करण्यासाठी हातात असलेल्या कलेच्या जोरावर मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील 11 मजूर पेव्हर ब्लॉकचे कामासाठी तालुक्यामध्ये आले आणि लॉकडाऊनमुळे अडकून पडले. त्यात मुकादमाने पैसे न दिल्यामुळे त्यांना गावी जाता येत नाही, अशा परिस्थितीत त्यांनी सायंकाळी मंगळवेढा सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या सतर्कतेमुळे त्यांना मंगळवेढ्यामध्ये राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून आधार दिला. तालुक्यातील पेट्रोल पंपाच्या परिसरामध्ये सुशोभिकरण करण्यासाठी पेव्हरब्लॉकचे काम करण्यासाठी मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील 11 मजूर त्यामध्ये नऊ पुरूष व दोन महिला या कामासाठी आले. जेमतेम एक महिना हे काम चालले. अशा परिस्थितीत कोरोना साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकारने लॉकडाऊन घोषित केला त्यामुळे महिन्या भराच्या कामातील मजुरीवर उपजिविका केली. उर्वरित कामासाठी व उपजीविका करण्यासाठी या मुकादमाने नुसतेच खात्यावर पैसे जमा करतो असे सांगण्यात येते. परंतु पैसे जमा न झाल्यामुळे त्यांनी चालत मंगळवेढा सोडण्याचा निर्णय घेतला पंढरपूर रोडवरील विरशैव मंगल कार्यालयाच्या परिसरात ...