Posts

Showing posts from July, 2020

मरवडे सरपंच निवडीवेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

Image
मंगळवेढा न्यूज 30 जुलै 2020   मरवडे सरपंच निवडीवेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण  निवडणुकीचा गुलाल अंगावर ताजा असतानाच ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी होणाऱ्या "त्या' सदस्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे समजताच, उर्वरित सदस्यांची मात्र पाचावर धारण बसली. कोरोना विषाणूबाधित सदस्याच्या संपर्कातील ग्रामपंचायतीच्या सदस्यांची कोरोना तपासणी करण्यात आल्यानंतर ग्रामपंचायतीचे इतर दोन सदस्यही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने कोरोनाने गावात प्रवेश केला. प्रथमतः ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाल्याचे समजताच गावात खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या संपर्कातील व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.   मरवडे (तालुका मंगळवेढा) गावच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया गेल्याच आठवड्यात पार पडली. या निवडणुकीच्या वेळेस कोरोना विषाणूची लक्षणे दिसत असूनही एक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहिला. आता त्याच्यासह इतर दोन सदस्यही कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. ग्रामपंचायत निव...

मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. रविवारी 7 रूग्णांची भर पडली आहे.

Image
मंगळवेढा न्यूज कोरोना विशेष बातमीपत्र 27 जुलै 2020. मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. रविवारी 7 रूग्णांची भर पडली आहे. मंगळवेढा न्यूज कोरोना विशेष  27 जुलै 2020 वैदयकीय रुग्णालय मंगळवेढा आणि ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा यांचे मार्फत आज 26 जुलै रोजी निकटतम संपर्कातील ( high risk contacts ) असणाऱ्या 11 जणांचे स्वब ( RT - PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत.  त्या व्यक्तींमध्ये मरवडे येथील 11 जणांचा समावेश आहे. तसेच 26 जुलै रोजी वैदयकीय रुग्णालय मंगळवेढा आणि ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा यांचे मार्फत 40 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. 40 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट मध्ये मंगळवेढा येथील 35 , बोरोळे येथील 5 जणांचा समावेश असून 40 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी मंगळवेढा येथील 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. तर उर्वरीत 33 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. आज अखेर एकुण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या - 86 झाली आहे.तरी आज अखेर उपचार कालावधीनंतर घरी सोडणेत आलेले रुग्ण संख्या 5 आहे.आणि आज अखेर उपचार घेत असलेली रुग्ण संख्या 80 झाली आहे. तर आज अखेर मयत रुग्ण सं...

सोलापूर शहरासह आजूबाजूच्या काही गावांत 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन

Image
सोलापूर शहरासह आजूबाजूच्या काही गावांत 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन लॉकडाऊनच्या काळात फक्त रुग्णालय, मेडिकल, डेअरी सुरु राहणार आहेत. या शिवाय पोलिस प्रशासनाचे दोन पेट्रोल पंप अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहणार असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. सोलापूर :  सोलापुरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.  जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण हे सोलापूर शहरात आहेत.  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ही साखळी तोडण्यासाठी शहरात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 16 जुलैच्या मध्यरात्रीपासून 26 जूलैपर्य़ंत लॉकडाऊन लागू असणार असल्याची माहिती  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. शुक्रवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत जिल्ह्याची कोरोना विषयक आढावा बैठक पार पडली होती. या बैठकीत शहरातील कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात यावा का या विषयी चर्चा कऱण्यात आली. या बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यां समवेत शहारातील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आमदार देखील उपस्थित होते. यावेळी लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचे मत स्...

१४० आकड्याने सुरू होणाऱ्या क्रमांकावरून फोन आल्यास घेऊ नका अफवा कि सत्य

Image
राज्यात १४० आकड्याने सुरू होणाऱ्या क्रमांकावरून फोन आल्यास घेऊ नका, आर्थिक फसवणूक होईल, अशी सूचना पोलीस वस्त्या-वस्त्यांमध्ये देत आहेत, अशा ध्वनिचित्रफिती शुक्रवारी संध्याकाळी समाजमाध्यमांवरून व्हायरल झाल्या आणि एकच घबराट पसरली. त्यानंतर ही एका वाहिनीवरील मालिकेची जाहीरात असून या अफवेवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मुंबई पोलिसांनी तातडीने केले.  नागरिकांनी एकमेकांना समाजमाध्यमांवरून ही ध्वनीचित्रफित पाठवली. मात्र मुंबई पोलीस दलाने ही अफवा असल्याचे काही वेळातच ट्वीटरच्या माध्यमातून स्पष्ट केले. राज्याच्या सायबर विभागानेही तातडीने वाहिनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा प्रकार लागलीच थांबवण्याची सूचना दिली. या प्रसंगाबाबत सायबर विभाग आपला अहवाल मुंबई पोलिसांना देणार आहे. या प्रकाराबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून वाहिनीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.  

सोलापुरातील वकील महिलेने हुंडा मागणीच्या जाचामुळे संपविले जीवन

Image
धक्कादायक; सोलापुरातील वकील महिलेने हुंडा मागणीच्या जाचामुळे संपविले जीवन By छत्रपती न्यूज नेटवर्क on Fri, July 03, 2020 10:47am सोलापुरातील घटना; प्राध्यापक पतीसह सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल सोलापूर  : सासरच्या त्रासाला कंटाळून वकील असलेल्या महिलेने राहत्या घरी अवघ्या एक वर्षाच्या मुलीला डोळ्यासमोर ठेवून गळफास घेतला. या प्रकरणी आईने दिलेल्या फिर्यादीवरून प्राध्यापक पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार दि.३० जून रोजी रात्री १०.३० ते ११.४३ दरम्यान घडला.  धनंजय शिवाजी पवार, सासू-शैलजा शिवाजी पवार,नणंद- सविता शिवाजी पवार, नणंद-दीपाली शिवाजी पवार (सर्व रा. जुनी पोलीस लाईन, मुरारजी पेठ,  सोलापूर ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. स्मिता धनंजय पवार (वय ३१, रा. जुनी पोलीस लाईन, मुरारजी पेठ, सोलापूर) असे  आत्महत्या  केलेल्या महिला  वकिलाचे  नाव आहे. या प्रकरणी आई सीतादेवी विठ्ठल गोवे (वय ५0, रा. उजनी वसाहत पाठीमागे संभाजी नगर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.  स्मिता यांचे माहेर मं...