Posts

Showing posts from September, 2020

कोरोनाचा कहर अजूनही चालूच 3 नवे रुग्ण तर 17 मयत | मंगळवेढा न्यूज

Image
कोरोनाचा कहर अजूनही चालूच 3 नवे रुग्ण तर 17 मयत | मंगळवेढा न्यूज

सहा महिन्यापासून ग्रामसभा न झाल्याने योजना लाभार्थींची अडचण | मंगळवेढा न्यूज

Image
सहा महिन्यापासून ग्रामसभा न झाल्याने योजना लाभार्थींची अडचण | मंगळवेढा न्यूज

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या पासवान यांना रोहित पवारांनी खडसावलं

मुलींचं लैंगिक शोषण होत असताना...    from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/3kfuPOE मुलींचं लैंगिक शोषण होत असताना...    https://ift.tt/eA8V8J

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री म्हणाले | मंगळवेढा न्यूज

Image
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री म्हणाले | मंगळवेढा न्यूज

स्वतःच्या जागेत कोविड सेंटर सुरु करणारा बीडचा अवलिया

बीड शहरातील एका व्यक्तीने स्वत:च्या जागेत कोविड रुग्णालय उभारलं आहे. from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2ZPB7Nt बीड शहरातील एका व्यक्तीने स्वत:च्या जागेत कोविड रुग्णालय उभारलं आहे. https://ift.tt/eA8V8J

बार्शी टेक्‍सस्टाईल मिल सहा महिन्यांपासून बंद; कामगारांवर उपासमारीची वेळ 

Image
बार्शी (सोलापूर) : एकेकाळी तीन सूत मिल असलेल्या, गिरणगाव म्हणून प्रसिद्घ असलेल्या बार्शीच्या राजन मिल, लोकमान्य मिल बंद पडल्यानंतर शेकडो कामगारांचे संसार उध्वस्त झाले. आर्थिक पडझडीमध्ये केंद्र शासनाच्या केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाने 1972 मध्ये...

शिवसेनेच्या गुंडगिरीला मुख्यमंत्र्यांचं समर्थन आहे का? नवनीत राणांचा सवाल

मदन शर्मा यांनी सोशल मीडियावर उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र फॉरवर्ड केल्यामुळे सात ते आठ जणांनी त्यांना मारहाण केली होती.  from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2Fxw2SB मदन शर्मा यांनी सोशल मीडियावर उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र फॉरवर्ड केल्यामुळे सात ते आठ जणांनी त्यांना मारहाण केली होती.  https://ift.tt/eA8V8J

राज्यातील श्रीमंत मराठा आमदारांना आरक्षण नकोय; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

गरीब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा.  from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2FpMowL गरीब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा.  https://ift.tt/eA8V8J

गोपचंद पडळकर यांच्यावर फुलांचा वर्षाव | मंगळवेढा न्यूज

Image
गोपचंद पडळकर यांच्यावर फुलांचा वर्षाव | मंगळवेढा न्यूज

महाराष्ट्राची बदनामी सहन करणार नाही; मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील प्रमुख 10 मुद्दे |

Image
  02.06 PM मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. मिशन बिगिन अगेनमध्ये महाराष्ट्राच्या बदनामीचा कट केला जात आहे. ही गोष्ट अजिबात सहन केली जाणार नाही. जे राजकारण करु पाहात आहेत, त्यांना करु द्या. सध्या मी शांत आहे, आज मी यावर काही बोलणार नाही. पण, महाराष्ट्राची बदनामी मुळीच सहन करणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे 10 मुद्दे - माझ्यावर आरोप लावला जात आहे, की मुख्यमंत्री घराबाहेर निघत नाहीत. मात्र, व्हिडिओ परिषदेद्वारे मी सर्वत्र पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे - सध्याच्या स्थितीत स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, तेव्हाच आपण आपल्या कुटुंबाला कोरोनापासून दूर ठेवू शकू. - येणाऱ्या काळात घरोघरी जाऊन ५५ वर्षांच्या वरील लोकांच्या आरोग्याची माहिती घेतली जाणार आहे. यामध्ये आमदार आणि खासदारांची मदत घेतली जाईल. - मास्कच आपली सुरक्षा करु शकतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाताना...

गोपचंद पडळकर यांच्यावर फुलांचा वर्षाव | मंगळवेढा न्यूज

http://gestyy.com/eenWG1

राजेवाडी तलाव सलग दुसऱ्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरला

Image
महूद (सोलापूर) : सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतील माणदेशी दुष्काळी पट्ट्याला शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून सुमारे 140 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेला राजेवाडी तलाव शुक्रवारी (ता.11) पूर्ण क्षमतेने भरला आहे. तसेच तलावाच्या... http://gestyy.com/eenchw

फाइव्ह जी तंत्रज्ञान विकासात भारत-अमेरिका-इस्रायल सहकार्य

Image
  अमेरिका-इस्रायल सहकार्य मोबाइलच्या ‘फाइव्ह जी’ तंत्रज्ञानाची यंत्रणा उभारण्यात हुआवे या चीनच्या कंपनीला अमेरिका व भारतासह अनेक देशांनी वगळले असतानाच आता ही यंत्रणा उभारण्यासाठी भारत, इस्रायल व अमेरिका हे सहकार्य करणार आहेत. फाइव्ह जी तंत्रज्ञानात या तीन देशांनी पुढाकार घेतला असून अमेरिकेतील भारतीय लोक व इस्रायल यांच्यातील संपर्कातून हा प्रस्ताव पुढे आला आहे. या तीन देशांनी सहकार्य करावे, असे जुलै २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलमधील भेटीत सूचित केले होते. भारत-अमेरिका-इस्रायल यांच्या आभासी शिखर बैठकीत त्यांनी सांगितले की, जगातील विकासाची आव्हाने हे तीन देश एकत्र येऊन पेलू शकतात. इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन माल्का व त्यांचे इस्रायलमधील समपदस्थ संजीव सिंगला यांची भाषणे झाली.

अमित शहांच्या तब्येतीत पुन्हा बिघाड, रात्री उशिरा 'एम्स'मध्ये दाखल केलं |

Image
   union home minister amit shah admitted aiims delhi | Mangalwedha News file photo नवी दिल्ली, वृत्तसंस्था :  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अनेक दिवसांपासून आरोग्याच्या समस्यांशी झगडत आहेत. अशा परिस्थितीत अमित शहा यांना दिल्लीतील एम्समध्ये पुन्हा दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्री 11 वाजता त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. गृहमंत्री अमित शहा यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. दरम्यान, उपचारानंतर त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर अमित शहा यांना रुग्णालयातून सोडण्यात आले होते. मात्र, अमित शहा यांना आता पुन्हा श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शहा यांना एम्समधील कार्डिओ न्यूरो टॉवरमध्ये दाखल करण्यात आले आहे. अमित शहा यांना श्वास घेण्यात त्रास होत आहे. त्यामुळे अमित शाह यांनी काही काळ रुग्णालयात राहावे. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली चांगले उपचार होतील, असे एम्सच्या सूत्रांनी सांगितले. अमित शहा यांना याआधी 18 ऑगस्टला नवी दिल्ली येथील एम्समध्ये दाखल करण...

उपचाराच्या बहाण्याने मांत्रिकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार! विवाह न करताच त्यांना झाली एक मुलगी अन्‌ पुढे...

Image
"अशी' आहे त्याच्या घरची परिस्थिती  तरटगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे शिवाजी सिद्राम कोल्हे याची पाच एकर शेजजमीन आहे. त्याला एक भाऊ असून तो लॉकडाउननंतर पुण्यात वाहनचालक म्हणून कामासाठी गेला आहे. हा शिवाजी आठवड्यातून एक-दोनदा शेताकडे ये-जा करीत होता. त्याचे वडील महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. शिवाजी कोल्हे याचा विवाह झाला नसून तो पत्रा तालिमजवळील काळी मशिदीजवळ तांत्रिक विद्या करीत होता.  सोलापूर  : मुलगा सातवी उत्तीर्ण झाल्यानंतर कुटुंबापासून वारंवार दूर राहिला. 2015 पासून तो सोलापुरात घर करून मांत्रिक म्हणून काम करीत होता. त्यावेळी महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या त्याच्या वडिलाने त्याच्याशी बोलणे बंद केले होते, अशी माहिती पोलिस तपासांत समोर आली आहे. त्याच्या सोलापुरातील घरात मांत्रिक विद्येचे साहित्य सापडले असून त्याच्याविरुध्द आता नवा गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकिशोर सोळुंखे यांनी दिली.  "अशी' आहे त्याच्या घरची परिस्थिती  तरटगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे शिवाजी सिद्राम कोल्हे याची पाच एकर शेजजमीन आहे. ...

नक्‍की वाचा ! सोलापुरातील 23 केंद्रावर रविवारी 'नीट'ची परीक्षा

Image
  उद्या (रविवारी) होणार दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत होणार परीक्षा  विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेच्या दोन तास अगोदर राहावे लागणार हजर  प्रत्येक विद्यार्थ्यांचे केले जाणार थर्मल स्क्रिनिंग; मास्क, हॅण्डग्लोज बंधनकारक  तापसदृश्‍य तथा आजारी असलेल्या विद्यार्थ्यांची केली जाणार स्वतंत्र सोय  एका वर्गात किमान 24 विद्यार्थीच बसणार; सोशल डिस्टन्सिंगचे केले जाणार पालन  परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यास दिले जाणार स्वतंत्र मास्क  सोलापूर :  नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (नीट) वतीने वैद्यकीय प्रवेशासाठी असणारी परीक्षा उद्या (रविवारी) सोलापूरासह देशभरात होईल. या परीक्षेचे सोलापूर शहर आणि पंढरपूर व अक्‍कलकोट येथे 23 केंद्र आहेत. सोलापुरातील या केंद्रांवर आठ हजार 228 जास्त विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती परीक्षा समन्वयक प्रा. एस. डी. शिरगावे यांनी दिली.  कोरोनामुळे यंदा परीक्षेसाठी तीन महिन्यांचा विलंब झाला आहे. कोरोनाच्या संसर्ग काळात ही परीक्षा होत असून संबंधित एजन्सीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना ज...

कंगना रणौत घेणार राज्यपालांची भेट

Image
  रविवारी १३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. (संग्रहित छायाचित्र) अभिनेत्री कंगना रणौत रविवारी १३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. राजभवनावर संध्याकाळी साडेचार वाजता कंगना राज्यपालांची भेट घेणार आहे. ‘इंडिया टुडे’नं हे वृत्त दिलं आहे. या भेटीमागचं कारण काय आहे हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे कंगना रणौत आणि शिवसेनेमधील संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना पालिकेने तिच्या घरातील कार्यालयात उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. कंगनाने मुंबईतील परिस्थिती पाकिस्तानव्याप्त काश्मीरप्रमाणे असल्यासारखे म्हटल्याने टीका झाली होती. त्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर कंगनाने आपल्याला मुंबईत पुन्हा येऊ नको, अशा धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप केला होता. तसेच आपण ९ तारखेला मुंबईत येत असून हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आवाहन दिले होते. बुधवारी कंगना मुंबईत पोहोचली. महापालिकेचे कर्मचारी तिच्या घरातील अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी गेले असता कंगनाने ट्विटरवरून त्यांचा समाचार...

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर अंतर्गत 65 उमेदवारांची भरती

Image
  Lokmangal Nagari Sahakari Patsanstha Solapur Recruitment 2020 Details Lokmangal Sahakari Patsanstha   Recruitment  :  लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर  अंतर्गत  65  उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख  18  सप्टेंबर 2020  आहे. ही भरती  ऑफलाइन  स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.  Lokmangal Nagari Sahakari Patsanstha Solapur   Recruitment 2020 Total Post (एकून पदे) : 65 Post Name (पदाचे नाव): शाखा अधिकारी – 10 पदे वसूली अधिकारी – 5 पदे अकाउंटेंट – 5 पदे लिपिक – 30 पदे इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग – 5 पदे शिपाई – 10 पदे Qualification (शिक्षण) : आहे. शाखा अधिकारी – MBA, B.Com, M.Com, GDC and A वसूली अधिकारी – B.Com, M.Com , GDC and A , B.A अकाउंटेंट – B.Co...

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली येथे भरती

Image
मंगळवेढा न्युज   ITI Shirala – Sangli   Recruitment 2020 :  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली 4+  उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख  19 सप्टेंबर   2020  आहे. ही भरती  ऑफलाईन  स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी ITI Shirala – Sangli   Recruitment 2020 Total Post (एकून पदे) : 04+ Post Name (पदाचे नाव): Engineer – Welder – Turner – Wireman – COPA – Qualification (शिक्षण) : Pay Scale (वेतन): रु.१४,०००/- प्रति महिना Application Mode (अर्ज कसा कराल)  : ऑफलाइन Location (नोकरीचे ठिकाण) : शिराळा, सांगली. Send Application on following Address  (अर्ज या पत्यावर पाठवावा ) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिराळा, सांगली. Important Dates (महत्त्वाच्या तारखा) 19 सप्टेंबर 2020 (येथे ...

IPL 2020 : मुंबई इंडियन्सचं बळ वाढलं, दोन महत्वाचे खेळाडू युएईत दाखल

Image
  सलामीच्या सामन्यात मुंबईसमोर चेन्नईचं आव्हान आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरपासून युएईत या स्पर्धेला सुरुवात होईल. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. सलामीच्या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या ताकदीत आता अजुन वाढ होणार आहे. कारण संघाचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड आणि यंदा मुंबईकडून खेळणारा शेर्फन रुदरफोर्ड हे युएईत दाखल झाले आहेत. कॅरेबिअन प्रिमीअर लिग स्पर्धेत खेळल्यानंतर पोलार्ड आणि रुदरफोर्ड हे दोन्ही खेळाडू आपल्या परिवारासोबत युएईत दाखल झाले आहेत. मुंबई इंडियन्सने या दोन महत्वाच्या खेळाडूंच्या आगमनाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. कायरन पोलार्ड यंदा फॉर्मात असणं मुंबई इंडियन्ससाठी फायदेशीर मानलं जातंय. कॅरेबिअन प्रमिअर लीग स्पर्धेत पोलार्डच्या त्रिंबागो नाईट रायडर्स संघाने विजेतेपद मिळवलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हा संघ या स्पर्धेत एकही सामना हरला नाही. पोलार्डने संपूर्ण स्पर्धेत गोलंदाजी आणि फलंदाजीत अष्टपैलू कामगिरी करत मालिकावीराच...

सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये करोनाचा कहर सुरूच | 12 सप्टेंबर 20 |मंगळवेढा न्यूज

http://dlvr.it/RgSlWB

“… हा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात मोठा अवमान”; शिवसेनेचा विरोधकांवर निशाणा

Image
  मुंबईच्या वाटेला वाद हे पाचवीलाच पुजलेले, शिवसेनेची टीका संग्रहित (पीटीआय) गेल्या काही दिवसांपासून कंगना आणि शिवसेनेचा सुरू असलेला वाद अद्यापगी शमलेला नाही. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी कवडीचे देणे-घेणे नसलेले त्यांचे थोतांडी अनुयायी विमानतळावर महाराष्ट्रद्वेष्टय़ांच्या स्वागतासाठी निळे झेंडे फडकवत हंगामा करतात. हा तर आंबेडकरांचा सगळ्यात मोठा अवमान आहे, असं म्हणत शिवसेनेनं विरोधकांवर निशाणा साधला. राष्ट्रीय एकात्मता तर आहेच आहे, पण राष्ट्रीय एकात्मतेचे हे तुणतुणे नेहमी मुंबई-महाराष्ट्राच्याच बाबतीत का वाजवले जाते? हे राष्ट्रीय एकात्मतेचे त्रांगडे इतर राज्यांच्या बाबतीत का लागू होत नाही? असा सवालही शिवसेनेनं केला आहे. मुंबई पाकव्याप्त कश्मीर आहे की नाही, हा वाद ज्यांनी निर्माण केला त्यांनाच तो लखलाभ ठरो. मुंबईच्या वाटेला वाद हे तसे पाचवीलाच पुजलेले आहेत. पण त्या सगळय़ा वादमाफियांना भीक न घालता मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणून मिरवत आहे. प्रश्न इतकाच आहे की, कौरव मंडळी भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण करताना सर्वच पांडव खाली मान घालून बसले होते. तसे काहीसे यावेळी ...

सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये करोनाचा कहर सुरूच

Image
  (संग्रहित छायाचित्र) सोलापूर शहरात शुक्रवारी करोना विषाणूने चारजणांचे बळी घेतले असून ५९ नवे बाधित रुग्ण आढळून आले, तर दुसरीकडे जिल्हा ग्रामीणमध्ये करोनाचा कहर सुरूच असून पुन्हा एकाच दिवशी १६ रुग्ण दगावले असून नव्याने ५४९ बाधित रुग्णांची भर पडली. काल गुरुवारीही जिल्ह्यात १४ रुग्णांचा मृत्यू होऊन तब्बल ६९७ बाधित रुग्ण सापडले होते. शुक्रवारी जिल्हा ग्रामीणमध्ये ४७११ चाचण्या घेण्यात आल्या असता त्यात ५४९ नवे बाधित रुग्ण सापडले. तर १६ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण बाधित रुग्णसंख्या १६ हजार ७५ इतकी झाली असून मृतांचा आकडाही ४६८ वर पोहोचला आहे. आतापर्यंत १० हजार ४९७ रुग्ण करोनामुक्त (६५.३० टक्के) झाले असून सध्या ५११० रुग्ण (३१.७८ टक्के) सक्रिय आहेत. मृत्यूचे प्रमाण २.९१ टक्के असून एकूण चाचण्यांच्या तुलनेने बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १२.५३ टक्के इतके आहे. सोलापूर शहरात जिल्हा ग्रामीणच्या तुलनेत मृतांची संख्या कमी म्हणजे ४४० असली तरी मृत्यूचे प्रमाण मात्र सहा टक्कय़ांच्या घरात आहे. शहरातील एकूण बाधित रुग्णसंख्या ७३६३ एवढी झाली आहे. शहर व जिल्ह्यात मिळून आतापर्यंत एक लाख ९९ हजार...

सरकार सुस्त; विधान परिषदेसाठी नावेच पाठविली नाहीत -राज्यपाल

Image
राज्य सरकारशी आपला कसलाही वाद नाही वा संघर्ष नाही संग्रहित छायाचित्र विधान परिषदेत राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या निवडीसाठी सरकारने नावे पाठविली नाहीत, सरकारच सुस्त आहे, टीका मात्र माझ्यावर होते, असे सांगत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारवर ठपका ठेवला. राज्य सरकारशी आपला कसलाही वाद नाही वा संघर्ष नाही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सूत्रे हाती घेतली त्याला ५ सप्टेंबरला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त वर्षभराच्या कामगिरीचा आढावा घेणारे जन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या नावाने पुस्तक प्रकाशित करण्यात आले. शुक्रवारी राजभवनात आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी समारंभानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली. राजकीय फटकेबाजी.. * देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सकाळी सकाळी शपथविधी उरकू न घेतला, त्यावरून आपल्यावर टीका झाली होती, त्याबद्दल आपणास काय वाटते असे विचारले असता, जर कुणी रामप्रहराला शपथ घेतली असेल, तर तुम्ही त्यावर प्रहार कशाला करता, असा उलट सवाल केला. * कंगना प्रकरणावरून आपण राज्...

मराठा संघटना आक्रमक : पंढरपुरात सरकारच्या फलकाचे दहन; सोलापुरात टायर जाळले

Image
    शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020 न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजाला, तसेच राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आरक्षण प्रश्नावरून मराठा समाजाच्या विविध संघटना पुन्हा आक्रमक होऊ लागल्या आहेत.  पंढरपूर : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेले शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (ता. 9 सप्टेंबर) स्थगिती दिली आहे. त्यानंतर मराठा समाजातील विविध संघटनांनी आक्रमक भूमिका घेत राज्य आणि केंद्र सरकार विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पंढरपूर येथे आज (ता. 11 सप्टेंबर) मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वय रामभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा विरोध करणाऱ्या फलकाचे दहन करून आंदोलन करण्यात आले.  दरम्यान, सोलापूर येथेही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पुणे-सोलापूर महामार्गावर टायर जाळून राज्य सरकारचा विविध संघटनांकडून निषेध करण्यात आला आहे. तसेच, शहरात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला.  सुमारे दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाज...

डोनाल्ड ट्रम्प पत्रकाराला म्हणाले…’मास्क काढून प्रश्न विचार’, रिपोर्टरने दिला नकार; नंतर…

Image
व्हाइट हाउसमध्ये नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेतली घटना   करोना संकटकाळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी मास्क न घातल्यामुळे तर कधी मास्कला आवश्यक नसल्याचं सांगितल्यामुळे चर्चेत राहिलेत. आता व्हाइट हाउसमध्ये नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला मास्क काढ, असं सांगतानाचा ट्रम्प यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ट्रम्प यांनी मास्क हटवण्यास सांगितल्यावर पत्रकाराने मात्र त्यासाठी नकार दिला. व्हाइट हाउसमध्ये सोमवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेतला हा व्हिडिओ असल्याचं समजतंय. Reuters या वृत्तसंस्थेचे पत्रकार जेफ मेसन यांनी ट्रम्प यांना एक प्रश्न विचारला, पण मास्क घातल्यामुळे ट्रम्प यांना त्यांचा आवाज कमी ऐकू येत होता. त्यामुळे ट्रम्प यांनी मेसन यांना मास्क काढून प्रश्न विचारण्यास सांगितलं. त्यावर मेसन यांनी मास्क हटवण्यास नकार दिला, पण आपण मोठ्या आवाजात बोलू असं म्हटलं आणि पुन्हा प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. त्यावर ट्रम्प यांनी, ‘तुम्ही किती दूर आहात…तुम्हाला मास्क हटवावा लागेल…तुम्ही काढू शकतात…जर तुम्ही मास्क हटवला नाही तर तुमचा...

मराठा आरक्षणावर शरद पवारांनी केलं वक्तव्य, म्हणाले…

Image
संग्रहित (PTI) शिक्षण आणि नोकऱ्यांमधील मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. मात्र, या आरक्षणाचा आधीच मिळालेला लाभ अबाधित राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हे प्रकरण अधिक न्यायाधीशांच्या पीठाकडे वर्ग करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारवर टीका होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. गुरुवारी पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी तोडगा काढण्याची सरकारची इच्छा असल्याचं म्हटलं. “मराठा आरक्षणाबाबत लवकरच तोडगा काढण्याची राज्य सरकारची इच्छा असून त्यांनी बैठक बोलावली आहे. त्यावर आता काय निर्णय घेतात पाहूया,” असं शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षां या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, समितीचे सदस्य नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कामगारमं...

भारताचा आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक घसरला; जागतिक स्तरावर मोदी सरकारला आणखीन एक झटका

Image
जगातील अनेक लहान देश भारताच्या पुढे   September 11, 2020 04:26 pm प्रातिनिधिक फोटो देशातील व्यापार आणि व्यवसायिक वातावरणाच्या स्वातंत्र्यासंदर्भातील परिस्थितीमध्ये भारताची जागतिक स्तरावर घसरण झाली आहे. आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारत २६ स्थानांनी घसरला आहे. वेगवेगळ्या देशांमधील व्यवसायिक वातावरण किती पोषण आणि देशातील आर्थिक परिस्थिती संबंधित मूल्यमापन करणाऱ्या कॅनडामधील फ्रेजर इन्स्टिटयूटने प्रकाशित केलेल्या ‘ग्लोबल इकनॉमिक फ्रिडम इंडेक्स’मध्ये भारत २६ क्रमांकांनी घसरुन १०५ व्या क्रमांकावर गेला आहे. या अहवालामध्ये १६२ देशांचा समावेश आहे. मागील वर्षी भारत ७९ क्रमांकावर होता. या यादीमध्ये हाँगकाँग आणि सिंगापूरसारखे लहान देश अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. अनेक छोटे देश हे या यादीमध्ये भारतापेक्षा बरेच पुढे असल्याचे दिसत आहे. मागील एका वर्षाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या देशांमधील सरकारांनी व्यवसाय आणि उद्योगांचा विस्तार, कायदेशीर यंत्रणा आणि संपत्तीसंदर्भातील अधिकार, जागतिक स्तरावरील व्यापाराचे स्वातंत्र्य, आर्थिक मोबदला, मनुष्यबळ आणि व्यवसाय यासारख्या व्यवसायाशी ...

तुळजाभवानी मंदिरातील दुर्मीळ नाणी आणि दागिन्यांची चोरी

Image
  तुळजाभवानी मंदिरातील दुर्मीळ नाणी आणि दागिन्यांची चोरी गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचे आदेश |  September 11, 2020  कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दुर्मीळ खजिन्यावर मंदिराच्याच धार्मिक व्यवस्थापकाने हात साफ केला आहे. विविध राजे आणि राजवाड्यांकडून दिलेली 71 पुरातन आणि दुर्मीळ नाणी तसेच देवीच्या अंगावरील दागिने गायब झाले आहेत. मौल्यवान माणिक, चांदीचे दोन खडाव आणि संस्थानाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच गायब केल्याचा अहवाल चौकशी समितीने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडीवर अफरातफर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. साडेतीन शक्तिपीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या श्रद्धेने भाविक तुळजापूर येतात. तुळजाभवानीच्या मंदिरातच हा धक्कादायक प्रकार घडल्याने भाविकांच्या श्रद्धेलाच तडा गेला आहे. पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे आणि त्यांचे विधिज्ञ शिरीष कुलकर्णी यांनी मंदिराच्या खजिन्यातील भ्रष्टाचाराच्या कारभाराविषयी अने...

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन कुणीही राजकारण करु नये

Image
  “मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन कुणीही राजकारण करु नये” मराठा समाजाची बाजू मांडणाऱ्या वकिलांचं आवाहन मंगळवेढा न्यूज |  September 11, 2020 03:49 pm संग्रहित छायाचित्र मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आली आहे ही मराठा समाजासाठी धक्कादायक बाब आहे. मात्र या सगळ्या प्रकरणाचं कुणीही राजकारण करु नये असं आवाहन आज मराठा आरक्षणाच्या लढ्यातील वकिलांची पत्रकार परिषद मुंबईत पार पडली या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली. मराठा आरक्षण खूप वर्षांच्या मागणीनंतर मिळालं होतं. त्यामुळे ते टीकणं महत्त्वाचं होतं. कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन सुनावणीला आम्ही सर्वांनीच विरोध दर्शवला होता. मात्र आता सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आली आहे. आम्हाला काहीसा वेळ कमी पडला असंही या पत्रकार परिषदेत वकिलांनी सांगितलं. अॅड. राजेश टेकाळे यांनी यावेळी सांगितलं की, “मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात जेव्हा सुनावणी झाली तेव्हा मी, अॅड. आशिष गायकवाड, अॅड. रमेश दुबे पाटील आणि अभिजित पाटील आम्ही सर्वांनी मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षण कशाप्रकारे टिकेल यासंदर्भात ऑर्ग्युमेंट केलं होतं. सु...

कंगनाची आई भाजपात, मोदी-अमित शाह यांचे मानले आभार

Image
  कंगनाची आई भाजपात, मोदी-अमित शाह यांचे मानले आभार महाराष्ट्र सरकारने कंगनाला दिलेली वागणूक निषेधार्ह Mangalwedha News ऑनलाइन |  September 11, 2020 08:48 am (संग्रहित छायाचित्र) बॉलिवूड अभिनेत्री कंगनाला वाय प्लस सुरक्षा दिल्यामुळे कंगनाच्या आईने मोदी सरकार आणि हिमाचल सरकाचे आभार व्यक्त केले. आमचे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत होतो. मात्र, मोदी सरकारने आमचे हृदय जिंकले आहे. यामुळे आता आम्ही पूर्णपणे भाजपाचे झालो आहोत, असे वक्तव्य कंगानाची आई आशा राणौत यांनी केलं आहे. कंगनाला वाय प्लस सुरक्षा देऊन आणि हिमाचल प्रदेशच्या जयराम ठाकूर सरकारनेही सुरक्षा पुरविल्यामुळे आम्ही भाजपाचे झालो आहोत, असे वक्तव्य कंगनाची आई आशा राणौत यांनी केले आहे. कंगनाच्या हिमाचल प्रदेशमधील मूळ घरी भाजपा कार्यकर्ते अन् स्थानिक नेते गेले होते. तेव्हा आशा राणौत यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी भाजपाच्या नेत्यांनी आशा राणौत यांना आम्ही कंगनासोबत असल्याचे अश्वासन दिलं. घाबरण्याची आवश्यकता नाही. हिमाचलच्या बेडर मुलीचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नसल्याचेही वक्तव्य स्थानिक भाजपा नेत्यांनी ...