मंगळवेढा तहसीलदारांच्या सतर्कतेमुळे ‘त्यांना’ मिळाला आधार
मंगळवेढा (सोलापूर) : उपजीविका करण्यासाठी हातात असलेल्या कलेच्या जोरावर मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील 11 मजूर पेव्हर ब्लॉकचे कामासाठी तालुक्यामध्ये आले आणि लॉकडाऊनमुळे अडकून पडले. त्यात मुकादमाने पैसे न दिल्यामुळे त्यांना गावी जाता येत नाही, अशा परिस्थितीत त्यांनी सायंकाळी मंगळवेढा सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या सतर्कतेमुळे त्यांना मंगळवेढ्यामध्ये राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून आधार दिला.
तालुक्यातील पेट्रोल पंपाच्या परिसरामध्ये सुशोभिकरण करण्यासाठी पेव्हरब्लॉकचे काम करण्यासाठी मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील 11 मजूर त्यामध्ये नऊ पुरूष व दोन महिला या कामासाठी आले. जेमतेम एक महिना हे काम चालले. अशा परिस्थितीत कोरोना साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकारने लॉकडाऊन घोषित केला त्यामुळे महिन्या भराच्या कामातील मजुरीवर उपजिविका केली. उर्वरित कामासाठी व उपजीविका करण्यासाठी या मुकादमाने नुसतेच खात्यावर पैसे जमा करतो असे सांगण्यात येते. परंतु पैसे जमा न झाल्यामुळे त्यांनी चालत मंगळवेढा सोडण्याचा निर्णय घेतला पंढरपूर रोडवरील विरशैव मंगल कार्यालयाच्या परिसरात पर्यंत चालत गेले. काही जागरूक नागरिकांनी त्यांच्या परिस्थितीची कल्पना तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या कानावर घातली. तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी तात्काळ तलाठी उमेश सूर्यवंशी यांना याबाबत सूचना देऊन संबंधित मजुराच्या राहण्याची व जेवण्याची व्यवस्था दामाजी महाविद्यालयात करण्यात आली. प्राचार्य एन. बी. पवार यांनी राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. तलाठी सुर्यवंशी यांनी जेवण उपलब्ध करून दिलासा दिला. लॉकडाऊनच्या काळात परप्रांतीय मजुराची रोजगार व अन्नावाचून होत असलेली उपासमार तहसीलदार रावडे सतर्कतेने टळली. पण उपाशी जीवन जगत असलेल्या मध्य प्रदेशात मजुराला मंगळवेढ्याचे महसूल प्रशासन आधारवड झाले.

Comments
Post a Comment