सोलापुरात रविवारी पाच नवे कोरोनाबाधित, एकुण पॅाझिटीव्ह 570
सोलापुरात रविवारी पाच नवे कोरोनाबाधित, एकुण पॅाझिटीव्ह 570
सोलापूर : जिल्हा प्रशासनाने आज रविवारी सकाळी प्रसिद्ध केल्यानुसार गेल्या बारा तासांत सोलापुरात पाच कोरोनाबाधित रुग्ण वाढले. बाधित रुग्णांमध्ये चार पुरुष आणि एक स्त्रीचा समावेश आहे.
गेल्या बारा तासात एकूण.77 अहवालांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी पाच अहवाल पॅाझिटीव्ह, तर 72 निगेटीव्ह आले. त्यामध्ये पुरुष आणि स्त्रियांचा समावेश आहे. आतापर्यंत 5500 अहवालांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 570 इतके पाॅझिटीव्ह तर 4930 इतके निगेटीव्ह अहवाल आले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 46 रुग्ण मरण पावले आहेत, तर 249 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन परत घरी गेले आहेत. सोलापुरात पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे, त्याप्रमाणे बरे होऊन परतणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे.
संबंधित बातम्या
धक्कादायक..! 'एनटीपीसी'चे 17 वीज वाहक टॉवर कापले

Comments
Post a Comment