जिल्ह्यातील २१ कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द; जिल्हाअधिक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांची कारवाई
मंगळवेढा न्यूज 22 August , 2020 जिल्ह्यातील २१ कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द; जिल्हाअधिक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांची कारवाई कृषी सेवा केंद्र चालकांना अनुदानि त खत पॉस मशिनवर नोंदणी करून विकणे बंधनकारक आहे, काही केंद्र चालकांनी याचा भंग केला असल्याने जिल्ह्यातील २१कृषी सेवा केंद्रांचे परवाने १० दिवसांसाठी निलंबित केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली. शासन अनुदानित खतांची विक्री करीत असताना शेतकऱ्यांना पॉस मशिनवर अंगठ्याचा ठसा नोंदवून खते मिळत होती. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अंगठा नोंदविण्याऐवजी आधार क्रमांक पॉस मशिनवर नोंदवून खते देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. काही कृषी सेवा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना खते देताना त्यांच्या आधार क्रमांकाऐवजी इतरांच्या नावाने पॉस मशिनवर नोंदणी केल्याचे दिसून आले आहे. खतांच्या वितरणामध्ये कोणतीही अनियमितता झालेली नाही, मात्र पॉस मशिनवर नोंदणी व्यवस्थित न केल्याने २१ कृषी सेवा केंद्र चालकांचा अहवाल उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहण...