सरकार सुस्त; विधान परिषदेसाठी नावेच पाठविली नाहीत -राज्यपाल

राज्य सरकारशी आपला कसलाही वाद नाही वा संघर्ष नाही

संग्रहित छायाचित्र

विधान परिषदेत राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या निवडीसाठी सरकारने नावे पाठविली नाहीत, सरकारच सुस्त आहे, टीका मात्र माझ्यावर होते, असे सांगत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारवर ठपका ठेवला. राज्य सरकारशी आपला कसलाही वाद नाही वा संघर्ष नाही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सूत्रे हाती घेतली त्याला ५ सप्टेंबरला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त वर्षभराच्या कामगिरीचा आढावा घेणारे जन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या नावाने पुस्तक प्रकाशित करण्यात आले. शुक्रवारी राजभवनात आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी समारंभानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली.

राजकीय फटकेबाजी..

* देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सकाळी सकाळी शपथविधी उरकू न घेतला, त्यावरून आपल्यावर टीका झाली होती, त्याबद्दल आपणास काय वाटते असे विचारले असता, जर कुणी रामप्रहराला शपथ घेतली असेल, तर तुम्ही त्यावर प्रहार कशाला करता, असा उलट सवाल केला.

* कंगना प्रकरणावरून आपण राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे का, या प्रश्नावर ‘माझी नाराजी कुणाला दिसली का, तसे मी कुणाशी काही बोललो का’, अशी उलट विचारणा करून त्यांनी हा प्रश्नही झटकून टाकला.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या पासवान यांना रोहित पवारांनी खडसावलं

स्वतःच्या जागेत कोविड सेंटर सुरु करणारा बीडचा अवलिया