सोलापुर ग्रामीणमध्ये 281 नवे बाधित रुग्ण
वरील इमेज वर👆 क्ली्क करून हीच बातमी youtube वर पाहू शकता
मंगळवेढा:
सोलापूर जिल्ह्याच्या 11 तालुक्यातील ग्रामीण भागातील अहवाल आज प्राप्त झाला आहे. त्यामध्ये आज नव्याने 281 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज 1 हजार 833 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 552 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 281 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय आज सहा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 8 हजार 661 वर गेली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील आरळी, चांभार गल्ली, लवंगी, लक्ष्मी दहिवडी, मुर्डे गल्ली, नागणे प्लॉट, नागणेवाडी, नाव्ही गल्ली, पंढरपूर रोड, क्वार्टर ग्रामीण रुग्णालय, सलगर बुद्रुक, शिक्षक कॉलनी,सांगोला तालुक्यातील घेरडी, बलवडी, खडतरे गल्ली, कोष्टी गल्ली, महूद, मुजावर गल्ली, प्राध्यापक कॉलनी, वाकी शिवणे येथे नवीन रुग्ण आढळून आले.
कोरोनाने आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 243 एवढी झाली आहे. अद्यापही दोन हजार 825 जण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. याशिवाय पाच हजार 593 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत
Comments
Post a Comment