मंगळवेढा कोरोना विशेष बातमीपत्र | आज 41 रुग्णांची वाढ | 19/08/2020
मंगळवेढा न्यूज 19 ऑगस्ट 2020
कोरोना विशेष बातमीपत्र.
----------------
मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा आकडा आता चिंतेत भर घालणारा आहे. काही दिवसांपासून कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज पुन्हा 41 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 333 वर गेली आहे.
तरी देखील बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होत आहे.त्यात आता काही ठिकाणी पान स्टॉल , हॉटेलही खुले झाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा विळखा कमी होण्याची चिन्हे नाहीत. मंगळवारी पुन्हा 41 नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत तालुक्यात तब्बल 333 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान आतापर्यंत 184 जणांना कोरोनावर मात करून ते कोरोनामुक्त झाले आहेत. तर दुसरीकडे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
------------------
आज 18 ऑगस्ट रोजी 61 जणांचे स्वब ( RT - PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आले.तसेच आज 20 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. 20 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट केलेल्या नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह 2 आणि निगेटिव्ह 18 आले.
सदर नागरिक हे आधंळगाव 2 येथील निकटतम पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहेत.
तर सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT - PCR ) चे आज 39 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहे. सदर नागरिक हे मंगळवेढा शहर 8 , दामाजीनगर 1 , चोखामेळानगर 1 , मरवडे 3 , शिरनांदगी 2 , बोरोळे 18, तळसंगी 5 , आणि सिध्देवाडी तालुका पंढरपूर 1 येथील निकटतम पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आज अखेरपर्यंत 333
रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 184 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आज पर्यंत 146 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.
----------------
ताज्या बातम्या पाहण्यासाठी मंगळवेढा न्यूज ला subscribe करा आणि बातमी लवकर मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.
Comments
Post a Comment