कंगनासाठी हिमाचलमधल्या गुंडांची स्टंटबाजी, थेट गृहमंत्र्यांना ९ वेळा धमकीचे फोन

 

कंगनासाठी हिमाचलमधल्या गुंडांची स्टंटबाजी, थेट गृहमंत्र्यांना ९ वेळा धमकीचे फोन | 


10.35 कंगनाच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन येऊ लागलेत. गृहमंत्र्यांना हिमाचल प्रदेशमधून काही गुंड सतत फोन करुन धमकी देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 
Anil Deshmukh Receive Threatened Call For Kangana

मुंबईः अभिनेत्री कंगना राणावतनं केलेल्या वक्तव्याचे सध्या पडसाद उमटत आहेत. मुंबई तसंच मुंबई पोलिसांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद पेटला आहे. कंगनाच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन येऊ लागलेत. गृहमंत्र्यांना हिमाचल प्रदेशमधून काही गुंड सतत फोन करुन धमकी देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 



'कंगना राणावत से दूर रहो...ये बात समझ लो...तुमने गलत किया अभी भी संभल जाओ नही तो...' अशा आशयाचे धमकीचे फोन गृहमंत्र्यांना आलेत. असे ७ फोन आल्याचं समजतंय. तर आज सकाळी म्हणजेच ९ सप्टेंबरला दोन वेळा धमकीचे फोन आले. धमकीचे हे फोन हिमाचल प्रदेशमधून आलेत.  हे फोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरुन येत आहेत. या धमकीच्या फोननंतर मुंबई पोलिसांनी तातडीने तपास करण्यास सुरुवात केली आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या पासवान यांना रोहित पवारांनी खडसावलं

स्वतःच्या जागेत कोविड सेंटर सुरु करणारा बीडचा अवलिया