सोलापूर जिल्ह्यात पीक कर्जवाटप ८० टक्क्यांवर
सोलापूर जिल्ह्यात पीक कर्जवाटप ८० टक्क्यांवर
सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला पीक कर्जवाटपासाठी देण्यात आलेल्या एकूण उद्दिष्ठापैकी ऑगस्टअखेर ११५१.७६ कोटी (८० टक्के) रुपयांचे वाटप झाले आहे. पहिल्या दीड महिन्यात रखडलेले कर्जवाटप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात काहिसे वेगाने झाले.
राष्ट्रीयकृत बँकांची उदासिनता
जिल्ह्यातील खासगी बँकानी त्यांच्या उद्दिष्टाच्या १६३ टक्के, तर विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेने सुमारे १४६ टक्के
कर्जवाटप केले आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी आतापर्यंत ६० टक्के कर्जवाटप करुन आपली उदासिनता कायम ठेवल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात यंदा खरीपाखालील पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे पीक कर्जाच्या मागणीत वाढ होणे अपेक्षित होते. त्यानुसार पीक कर्जवाटप केले जावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. त्यानुसार वाटप वेळेत आणि सर्वाधिक कसे होईल, यावर लक्ष दिले.
- प्रशांत नाशिककर, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, सोलापूर
| बॅंकेचे नाव | कर्जवाटप उद्दिष्ट (रू. लाखांत) | प्रत्यक्षात वाटप | टक्केवारी |
| राष्ट्रीयीकृत बॅंका | १०५९६९.०० | ६३५९९.०१ | ६०.०२ |
| खाजगी बॅंका | १८२८६.०० | २९८५२.७८ | १६३.२५ |
| जिल्हा मध्यवर्ती बॅंक | १५४५७.०० | १५६४३.७७ | १०१.२१ |
| विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक | ४१४०.०० | ६०८१.२९ | १४६.८९ |
| एकूण | १४३८५२.०० |

Comments
Post a Comment