CoronaVirus : जिल्हा नियोजन मंडळाकडून सर्व नगरपालिकांना निधी उपलब्ध करून घ्यावा : अजित जगताप
- Get link
- X
- Other Apps
Home Maharashtra Maza Solapur CoronaVirus : जिल्हा नियोजन मंडळाकडून सर्व नगरपालिकांना निधी उपलब्ध करून घ्यावा : अजित जगताप
CoronaVirus : जिल्हा नियोजन मंडळाकडून सर्व नगरपालिकांना निधी उपलब्ध करून घ्यावा : अजित जगताप
मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांना जिल्हा नियोजन मंडळाकडून प्रत्येकी 25 लाख रूपये निधी उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य तथा मंगळवेढयाचे न.पा.पक्षनेते अजित जगताप यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचेकडे एका अर्जाद्वारे केली आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांमार्फत आवश्यक ती उपाययोजना राबवण्यात येत आहे.
याकामी नगरपरिषद अथवा नगरपंचायतीमधील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, थर्मल स्क्रिनिंग तपासणी करणारे कर्मचारी, घरोघर जावून आय.एल.आय. व सारी चा सर्वे करणार्या कर्मचार्यांना पी.पी.ई.कीट, सेप्टी मास्क, हँड सॅनिटायझर, हॅन्ड वॉश, हॅन्डग्लोज, गम वूट, फेस सिल्ड इ.संरक्षक साहित्याची आवश्यकता भासत आहे. तसेच सर्व नगरपरिषदांमध्ये निर्जंतुकीकरणयासाठी सोडीयम हायपोक्लोराईड या जंतुनाशकाची आवश्यकता आहे.
सध्या सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषद/नगर पंचायती यांच्या फंडामध्ये पुरेसा निधी उपलब्ध नाही. सध्या नगरपरिषदांकडील कर वसुली व पाणीपट्टी वसुली बंद असल्यामुळे उत्पन्न थांबल्याने सोयीसुविधा पुरवण्यासाठी आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment